Bag icon
Text logo
खोल्बा मुला...धक्-धक्
SHRAVYA

साहित्य पाटी
›आरती संग्रह
ब्रिबा· salemydop.com
ब्रिबा· salemydop.com
आरती संग्रह

🪔

करवीरपुरवासिनी सुरवरमुनिमाता

जय देवी जय देवी जय महालक्ष्मी ।
वससी व्यापकरूपे तू स्थूलसूक्ष्मी ॥ धृ. ॥
करवीरपुरवासिनी सुरवरमुनिमाता ।
पुरहरवरदायिनी मुरहरप्रियकांता ।
कमलाकारे जठरी जन्मविला धाता ।
सहस्रवदनी भूधर न पुरे गुण गाता ॥ १ ॥
जय देवी जय देवी ॥
मातुलिंग गदा खेटक रविकिरणी ।
झळके हाटकवाटी पीयुषरसपाणी ।
माणिकरसना सुरंगवसना मृगनयनी ।
शशिकरवदना राजस मदनाची जननी ॥ २ ॥
जय देवी जय देवी ॥
तारा शक्ती अगम्या शिवभजका गौरी ।
सांख्य म्हणती प्रकृती निर्गुण निर्धारी ।
गायत्री निजबीजा निगमागम सारी ।
प्रगटे पद्मावती निजधर्माचारी ॥ ३ ॥
जय देवी जय देवी ॥
अमृतभरिते सरिते अघदुरिते वारी ।
मारी दुर्घट असुरा भवदुस्तर तारी ।
वारी मायापटल प्रणमत परिवारी ।
हे रूप चिद्रूप दावी निर्धारी ॥ ४ ॥
जय देवी जय देवी ॥
चतुराननें कुश्चित कर्मांच्या ओळी ।
लिहिल्या असतिल माते माझे निजभाळी ।
पुसोनि चरणातळी पदसुमने क्षाळी ।
मुक्तेश्वर नागर क्षीरसागरबाळी ॥ ५ ॥
जय देवी जय देवी ॥

✦ ✦ ✦

अघिला

८४ न्हाङला ८४

धर्म र भक्ति
आरती

०

०

०

७ खेप छ्याजी

कार्तिक ३, २०८३

© Xtreme Soul · salemydopरी ङाच्याङ प्रकाशित तबा ढिन कार्तिक ३, २०८३. सबै अधिकार लेखकला हिन्; अनुमति आरेबा कपी आल्हाबा। कपी ल्हाबा रचनाला उजुरी ल्हाबा

लेखक

X

Xtreme Soul

टिप्पणी
​
​

लेखक

X

Xtreme Soul

Xtremesoul
नीतिसबै नीति·सम्पर्क ल्हाबा