Bag icon
Text logo
खोल्बा मुला...धक्-धक्
SHRAVYA

साहित्य पाटी
›आरती संग्रह
ब्रिबा· salemydop.com
ब्रिबा· salemydop.com
आरती संग्रह

🪔

युगे अठ्ठावीस विटेवरी उभा

युगे अठ्ठावीस विटेवरी उभा ।
वामांगी रखुमाई दिसे दिव्य शोभा ।
पुंडलिकाचे भेटी परब्रह्म आले गा ।
चरणी वाहे भीमा उद्धरी जगा ॥
जय देव जय देव जय पांडुरंगा ।
रखुमाई वल्लभा राईच्या वल्लभा
पावे जिवलगा ॥ जय देव ॥
तुळसी माळा गळा कर ठेवुनी कटी ।
कासे पितांबर कस्तुरी लल्लाटी ।
देव सुरवर नित्य येती भेटी ।
गरुड हनुमंत पुढे उभे राहती ॥ जय देव ॥
धन्य वेणुनाद अनुक्षेत्रपाळा ।
सुवर्णाची कमळे वनमाळा गळा ।
राई रखुमाबाई राणीया सकळा ।
ओवाळू आरत्या विठोबा सावळा ॥ जय देव ॥
ओवाळू आरत्या कुरवंड्या येती ।
चंद्रभागेमध्ये सोडूनिया देती ।
दिंड्या पताका वैष्णव नाचती ।
पंढरीचा महिमा वर्णावा किती ॥ जय देव ॥
आषाढी कार्तिकी भक्तजन येती ।
चंद्रभागेमध्ये स्नान जे करिती ।
दर्शन हेळामात्रे तया होय मुक्ती ।
केशवासी नामदेव भावे ओवाळीती ॥ जय देव ॥

✦ ✦ ✦

अघिला

८४ न्हाङला ७८

लिउला
धर्म र भक्ति
आरती

०

०

०

९ खेप छ्याजी

कार्तिक ३, २०८३

© Xtreme Soul · salemydopरी ङाच्याङ प्रकाशित तबा ढिन कार्तिक ३, २०८३. सबै अधिकार लेखकला हिन्; अनुमति आरेबा कपी आल्हाबा। कपी ल्हाबा रचनाला उजुरी ल्हाबा

लेखक

X

Xtreme Soul

टिप्पणी
​
​

लेखक

X

Xtreme Soul

Xtremesoul
नीतिसबै नीति·सम्पर्क ल्हाबा