Bag icon
Text logo
جارٍ التحميل...دَق-دَق
SHRAVYA

ساهيتيا باتي
›आरती संग्रह
اكتب· salemydop.com
اكتب· salemydop.com
आरती संग्रह

🪔

लवथवती विक्राळा ब्रह्मांडी माळा

लवथवती विक्राळा ब्रह्मांडी माळा ।
विषे कंठ काळा त्रिनेत्री ज्वाळा ।
लावण्य सुंदर मस्तकी बाळा ।
तेथुनिया जळ निर्मळ वाहे झुळझुळा ॥ जय देव ॥
जय देव जय देव जय श्री शंकरा ।
आरती ओवाळू तुज कर्पूरगौरा ॥ जय देव ॥
कर्पूरगौरा भोळा नयनी विशाळा ।
अर्धांगी पार्वती सुमनांच्या माळा ।
विभूतीचे उधळण शितकंठ नीळा ।
ऐसा शंकर शोभे उमावेल्हाळा ॥ जय देव ॥
देवी दैत्य सागर मंथन पै केले ।
त्यामाजी अवचित हळहळ जे उठले ।
ते त्वा असुरपणे प्राशन केले ।
नीळकंठ नाम प्रसिद्ध झाले ॥ जय देव ॥
व्याघ्रांबर फणिवरधर सुंदर मदनारी ।
पंचानन मनमोहन मुनिजन सुखकारी ।
शतकोटीचे बीज वाचे उच्चारी ।
रघुकुळटिळक रामदासा अंतरी ॥ जय देव ॥

✦ ✦ ✦

السابق

80 من 84

التالي
الدين والتعبّد
آرتي

0

0

0

7 مشاهدة

أكتوبر 20, 2026

© Xtreme Soul · نُشرت أول مرة على سيل ماي دوب في أكتوبر 20, 2026. كل الحقوق للكاتب؛ يُرجى عدم النسخ دون إذن. الإبلاغ عن عمل منقول

كاتب

X

Xtreme Soul

التعليقات
​
​

كاتب

X

Xtreme Soul

Xtremesoul
السياساتكل السياسات·اتصل بنا